यशवंतराव चव्हाण मुक्त आवास योजनेअंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्यात 188 घरकुल मंजूर
आ सुधाकर भालेराव
उदगीर
राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बंजारा समाजातील घरापासून वंचित असलेल्या लोकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अमलात आणली असून या योजनेअंतर्गत आमदार सुधाकर भालेराव यांनी उदगीर जळकोट तालुक्यात एकूण 188 घरकुल यांच्या शिफारशीने मंजूर करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली
अनेक वर्षापासून वस्ती तांड्यावर आजही बंजारा बांधव झोपडीत आपले वास्तव्य करीत होते त्यांना ऊन वारा पाऊस झेलत उघड्यावर संसार करावा लागत होता अशा निराश्रित लोकांनी शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सुधाकर भालेराव यांनी केले होते त्या अनुषंगाने आमदार सुधाकर भालेराव यांनी शिफारस केलेल्या उदगीर व जळकोट तालुक्यातील एकूण 188 घरकुल मंजूर करून त्यासाठी एकूण 2 कोटी50लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला आहे त्याबद्दल त्यांचे उदगीर व जळकोट तालुक्यात अभिनंदन होत आहे
0 Comments