लिंगायतांना आरक्षण न दिल्याने सरकारच्या निषेधार्थ विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लिंगायत महासंघाचा जाहीर पाठिंबा

लिंगायतांना आरक्षण न दिल्याने सरकारच्या निषेधार्थ विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लिंगायत महासंघाचा जाहीर पाठिंबा
लातूर ः महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण देणे म्हणून पाच वर्षे भाजपा सरकारने झुकवले व आरक्षण न दिल्याने नाराज होवून नाईलाजाने आगामी विधानसभा निवडणुकीत लिंगायत महासंघ व लिंगायत आरक्षण कृती समितीचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठींबा देत असल्याचा निर्णय दि. 18 सप्टेंबर रोजी लातूर येथे झालेल्या लिंगायत महासंघाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी जाहीर केले.
ते बैठकीला मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले 5 वर्षापासून भाजपा सरकारकडे लिंगायतांना आरक्षण लागू होण्यासाठी शुध्दीपत्रक काढावे ही मागणी केली. अनेक आंदोलने केली. निवेदने दिले. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकाही झाल्या. मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासनेही दिली. शब्द दिला. पण लिंगायत आरक्षणाचा शब्द शेवटपर्यंत पूर्ण केला नाही. लिंगायत समाजाची सरकारने फसवणूक केल्याने मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाला साथ देणार्‍या लिंगायत महासंघाने या विधानसभा निवडणूकीत शासनाचा निषेध म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी सांगितले.
या बैठकीत महाराष्ट्रातील 50 विधानसभा मतदारसंघात लिंगायत उभे करण्याचा निर्णय मागे घेण्यात. त्यामुळे लिंगायत महासंघाचे कार्यकर्ते व त्यांच्यावर विश्‍वास ठेवणारे समाज बांधव हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा जाहीर  प्रचार करतील असेही प्रा.सुदर्शन बिरादार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
या बैठकीत पुणे येथे प्रा.सुदर्शन बिरादार यांच्यावर अविनाश भोसीकर यांच्याकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला व त्यावर कारवाई करावी व प्रा.सुदर्शन बिरादार यांना संरक्षण द्यावे हा ठराव घेण्यात आला. व त्याचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. 
बुधवारी झालेल्या बैठकीत हॉटेल रिलॅक्स लातूर येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.सुदर्शन बिरादार हे होते. यावेळी सोमनाथ स्वामी डिगोळकरांना लिंगायत महासंघाच्या शिरूर अनंतपाळ उपाध्यक्षपदी प्रा.सुदर्शन बिरादार यांनी निवड जाहीर केली. 29 सप्टेंबर रोजी होणार्‍या लातूर येथील वधू-वर मेळाव्याच्याही सुचनांही कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी अनेकांची भाषणे झाली.
या बैठकीला सिसद्रामप्पा पोपडे, नागनाथ भुरके, माणिकअप्पा मरळे, पंडितराव भुरे, अशोक काडादी, चंद्रकांत कालापाटील, अमरनाथ मुळे, गुरूनाथ काडवदे, दिलीप सोलगे, काशिनाथ मोरखंडे, जी.जी.ब्रम्हवाले, सुर्यकांत थोटे, राहुल तोंडारे, बसवराज बिरादार, शंकरराव धोंडापूरे, राजकुमार मिटकरी, सोमनाथ स्वामी डिगोळकर, विजयमुर्ती बिडवे, शिवदास लोहारे, तानाजी पाटील, विरेंद्र अक्कानवरू यांच्यासह अनेक गावातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments