गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकहाती सत्ता देऊन सत्ताधाऱ्यांना जनतेला पाणी देता आले नाही ही शोकांतिका आमदार अमित विलासराव देशमुख.

गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकहाती सत्ता देऊन सत्ताधाऱ्यांना
जनतेला पाणी देता आले नाही ही शोकांतिका
आमदार अमित विलासराव देशमुख.

लातूर प्रतिनिधी :
   जनतेने या विदयमान सत्ताधाऱ्यांना गल्ली पासून दिल्ली पर्यंत एकहाती सत्ता दिली. मात्र  सत्ताधाऱ्यांना पाच वर्षात जनतेला साधे पिण्याचे पाणी देता आले नाही, ही एक शोकांतिका असल्याचे मत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले, ते लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट या ठिकाणी जनसंपर्क अभियाना अंतर्गत आयोजित संवाद बैठकीत बोलत होते.



    अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर लातूर शहर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियाना अंतर्गत आज शनिवार ७ सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील स्क्रॅप मार्केट भागात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पूढे बोलतांना लातूरच्या जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्या ऐवजी अफवा पसरवून बदनामी करणे, जनतेच्या मनात संशय निर्माण करणे अशा गोष्टी घडत आहेत. यावर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments