*जनतेच्या पाठिंब्यामुळे मतदार संघाचा विकास साधता आला*
आ सुधाकर भालेराव
उदगीर
आमदार म्हणून एक नाही दोन वेळा उदगीरच्या बहाद्दर मतदारांनी मला मतदान रुपी आशीर्वाद दिले म्हणूनच विकासापासून वंचित असलेल्या मतदार संघातील प्रत्येक गाव वस्ती तांडा चा विकास साधण्यासाठी विकास निधी आणु शकलो तो केवळ मायबाप मतदारांच्या पाठिंब्यामुळे च असे मत विधानसभा मतदारसंघाचे आ सुधाकर भालेराव यांनी व्यक्त केले
ते भाकसखेडा व उदगीर येथील प्रभाग अठरा मधील रस्ते विकास कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते पुढे बोलताना आ भालेराव म्हणाले भाकसखेडा व उदगीर शहरातील प्रभाग अठरा मधील श्रीनगर कॉलनी ही रस्ते विकासापासून वंचित होती याठिकाणी आमदार स्थानिक विकास निधी व मूलभूत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून रस्ते विकासाचे काम करण्याबरोबरच भाकसखेडा येथील शिधा पत्रिके पासून वंचित असलेल्या नागरिकांना शिधापत्रिका मिळावी यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले म्हणूनच आज शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिका वाटप करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले या कार्यक्रमासाठी नुतन उपविभागीय अधिकारी पी एस मेगशेट्टी तहसीलदार वेंकटेश मुंडे नायब तहसीलदार राजेश जाधव जि प सदस्या उषाताई रोडगे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे उपाध्यक्ष सुधीर भोसले सरपंच भास्कर जाधव रामचंद्र मुक्कावार रामेश्वर पवार शहाजी पाटील अँड दत्ता पाटील सावन पस्तापुरे लाखन कांबळे आनंद बुंदे मारुती जाधव अंतेश्वर रोडगे अविनाश बेळकुंदे वसंत पाटील तातेराव शिंदे श्रीनिवास काशागौड बाळासाहेब पाटोदे श्रीकांत कोंपले रामदास जाधव आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजकुमार मोगले तर उपस्थितांचे आभार दत्ता पाटील यांनी मानले
0 Comments