तलावात बुडताना एका तरुणीचे प्राण वाचविण्यास वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सद्दाम शेख हे खाकी वर्दीतील देवदूतच.


           दिनांक 13 /11 /2019 रोजी आंबेगाव जांभुळवाडी पुणे या ठिकाणी एक भलामोठा तलाव आहे. त्याच्या आसपास बर्‍यापैकी लोकवस्ती आहे. याच लोकवस्तीतील   एका अविवाहित युवतीने या तलावांमध्ये आत्महत्या करण्यासाठी सकाळी दहा ते साडेदहा च्या दरम्यान  उडी मारली होती .त्या तरुणीच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने  ती तरुणी पुर्ण घाबरली होती. व ती जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले होती. याच  तलावाच्या काठावर सुमारे 20 ते 25 तरुण युवक थांबलेले होते. परंतु एकाही युवकाने या तरुणीला वाचवण्यासाठी प्रयत्न न करता नुसती बघ्याची भूमिका घेतली होती .लोकांची गर्दी जमू लागली होती .त्याच दरम्यान  तलावाच्या बाजूने खाकी वर्दीतील पोलिस कर्मचारी सद्दाम शेख (बक्कल नं १०५०८ ) हे काही कामानिमित्त तेथुन  चालले होते.त्यांनी तरुणी तलावात बुडताना  पाहीले त्या वेळी आजुबाजुचे तरुण त्या तरुणीचा जीव वाचण्यासाठी काहीच करीत नसल्याचे पाहुन त्यांनी कोणताही विचार न करता त्या तरुणीला जिवदान देण्यासाठी सरसावले. त्यांनी मोबाईल व पाकीट काठावर थांबलेल्याज्ञ एका युवकाकडे दिला व अंगावरच्या कपड्यां सहीत  पाण्यात झेप घेतली. त्या मुलीचा हात धरला तिच्या नाकातोंडात  पाणी गेल्याने  ती तरुणी खुपचं घाबरलेल्या अवस्थेत होती . पोलीस कर्मचारी सद्दाम शेख यांनी त्या तरुणीला मदतीचा हात दिला व तिला तलावाच्या काठावर आणले व तिची आत्मियतेने चौकशी व विचारपूस केली .तिला जीवन म्हणजे काय आलेल्या संकटाला सामोरे जावुन संकटावर मात करून स्वत चे जिवन सुकर करण्याची जिद्द धरावी .  आत्महत्या हा पर्याय नसुन तो  चुकीचा मार्ग असल्याचे तिला समजून सांगितल्याने  .त्या मुलीने या पोलिस कर्मचारी चे आभार मानले.
               वास्तविक पाहता तालावर 20 ते 25 तरुण युवक होते .तरीही त्यांनी त्या तरुणाला वाचण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही .ही  मोठी खेदजनक बाब वाटते .जर त्यावेळी पोलिस कर्मचारी त्या वेळी तेथे उपस्थित नसते तर त्या तरुणीला  आपला जीव गमवावाच  लागला असता. या  उत्कृष्ट कामगिरी मुळे या पोलीस कर्मचार्याचे   सर्वत्र कौतुक होत आहे .अशा काही पोलीसां च्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची शान जनसामान्यात थोड्याफार प्रमाणात तरी शिल्लक आहे.

Post a Comment

0 Comments