डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रस्तावास मुदतवाढ


लातूर, दि.5:- राज्यातील नोंदणीकृत मदरसांना आधुनिकीरणासाठी डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 मध्ये शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2013 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेस दिनांक 24 ऑक्टोबर 2019 अन्वये मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण या नियमीतपणे राबविल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत संस्थाचालकांनी/मदरसा चालकांनी दि. 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर या कार्यालयात दिनांक 30 नोव्हेंबर,2019 दुपारी 5 वाजे पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. याची नोंद घेऊन विहित मुदतीत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एम.एस. दुशिंग यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments