प्रतिनिधी : साकीनाका ते बैलबजार कमानी पर्यंत अंधेरी कुर्ला रोड रुंदीकरणाबाबत सध्याचे आयुक्त श्री प्रवीण परदेशी तसेच त्यांच्या पूर्वीचे मनपा आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या दालनात उच्च स्तरीय अधिकाऱ्यासोबत वारंवार बैठका घेऊन व त्यानंतर आयुक्तांनी ३ टप्प्यात काम पूर्ण करण्याचे लेखी आदेश देऊनही अद्याप रुंदिकरणाचा प्रश्न आहे तसाच असल्याने मनपाच्या हलगर्जीपणामुळे रुंदीकरणात दिरंगाई होत असल्यामुळे या मार्गाहून प्रवास करणारे लाखो प्रवासी, विद्यार्थी, महिला, वृद्ध तसेच स्थानिक नागरिकांच्या मनात मनपाच्या विरोधात तीव्र रोष आहे.
आज माजी मंत्री मो आरिफ (नसीम) खान यांनी लेखी पत्र लिहून मनपा आयुक्त श्री प्रवीण परदेशी यांना त्यांनी दिलेल्या लेखी आदेशाची आठवण करून देत साकीनाका ते बैलबजार कमानी पर्यंत अंधेरी कुर्ला रोड रुंदीकरण लवकरच मार्गी नाही लागल्यास मनपा विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कळविले.
0 Comments