उदगीर : उदगीर व जळकोट तालुक्यात मागील काळात अनेक प्रकारची निकृष्ठ कामे झाली. परंतु यापुढे कोणत्याही विकासकामात गुणवत्ता व दर्जा पाहीला जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड दम आमदार संजय बनसोडे यांनी दिला आहे.
दि.18 रोजी सुकणी ते उदगीर या डांबरीकरणाचा शुभारंभ आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी कामाचा दर्जा व गुणवत्ता कायम राखावी. काम जलद आणि दर्जेदार करावे. केवळ कामचलावू विकासकामे केली तर त्यांना पाठीशी घालणारे कोणीही राहणार नाही, मतदार संघातील सर्व कामांचा दर्जा अधिकार्यांनी राखावा. ठेकेदार व अधिकारी यांनी संगनमत करुन विकासकामे करु नयेत, असे सांगुन अधिकार्यांना दर्जा व गुणवत्तेची सुचना केली.
यावेळी कल्याण पाटील यांनी, कामांचा दर्जा जर निकृष्ठ झाला तर मागच्या सारखे आता चालणार नाही. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार संजय बनसोडे यांच्यासोबतच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर असल्याचे सांगुन अधिकार्यांनी चालढकल करुन विकास कामे करु नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
त्यांच्यासोबत काँगे्रसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शाम डावळे, दत्ता बामणे, माधव कांबळे, ज्ञानोबा गोडभरले,पिंटु कनकुरे, अशोकराव माने, ज्ञानेश्वर भांगे, प्रशांत सुकणे, जितेंद्र सुकणे, नरसिंग बापु, माधवराव माने, बाबासाहेब काळे, संतोष बिरादार, विठ्ठलराव मुळ,े चांदोबा सुकणे, बजरंग शाहीर, सतीश काळे, गिरीधर शाहीर, संतोष क्षीरसागर यांच्यासह उपअभियंता देशपांडे व वाढवणा परीसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
0 Comments