मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा



लातूर,दि.5:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध्‍ होण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, लातूर यांनी केले आहे.
योजनेची माहिती पूढील प्रमाणे आहे- योजनेचे कार्यक्षेत्र-महाराष्ट्र (अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे ) योजनेचे निकष:- वयोमर्यादा 18 ते 45 अ.जा./अ ज/महिला माजी सैनिक यांना / 50 वर्ष, शैक्षणिक पात्रता- प्रकल्प रु. 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास, प्रकल्प रु. 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास, उत्पादन उद्योग :- कमाल प्रकल्प मर्यादा रु. 50 लाख, सेवा उद्योग कमाल प्रकल्प मर्यादा रु.10 लाख, स्वगुंतवणूक :- 5 ते 10 टक्के, अनुदान मर्यादा :- 15 ते 35 टक्के.
ही योजना नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे. 
पात्र मालकी घटक:- वैयक्तिक, भागीदारी, बचत गट, ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित कागदपत्र, पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड, जन्म दाखलाडोमिसीयल सर्टिफिकेट/ शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी /12 वी/ पदवीचे गुणपत्रक, हमीपत्र वेबसाईटवरिल मेनोमध्ये मिळेल. (Undertaking Form) 
प्रकल्प अहवाल- जातीचे प्रमाणपत्र (अ ज असेल तर / अ जा), विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र उदा.माजी सैनिक ,अपंग (REDP/EDP) किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र, लोकसंख्याचा दाखला, 20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अधिकार पत्र, घटना .
प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर अधारीत असणे आवश्यक आहे.स्थिर भांडवल मशीनरी रक्कम कमीत कमी -50 टक्के, इमारत बांधकाम- कमाल मर्यादा %20,खेळते भांडवल कमाल- मर्यादा %30
योजनेचा लाभ घेण्यासाठी  तात्काळ संकेतस्थळाला http://maha-cmagp.gov.in भेट दयावी व संकेतस्थळावर आपले अर्ज दाखल करावेत असेही पत्रात नमुद केले आहे.

                                           ****

Post a Comment

0 Comments