शेतकर्यांनी पशुसंवर्धनाकडे शेतीपुरक व्यवसाय म्हणून पहावे ः आमदार संजय बनसोडे
उदगीर ः लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा हाळी हंडरगुळीचा बैलबाजाराचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अलिकडे पशुधनाची कमतरता, चारा पाण्याचे दूर्भिक्ष यामुळे शेतकर्यांना पशुधन परवडत नसल्यामुळे शेतकर्यांकडे पशुधन घटले आहे. बैलबाजारात शेतकर्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, शेतकर्यांना पशुधन संवर्धनासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन आमदार संजय बनसोडे यांनी बैलबाजाराच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.
महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा सीमाभागातील सुप्रसिध्द बैलबाजाराचा शुभारंभ दि.03 रोजी हाळी - हंडरगुळी येथे आमदार बाबासाहेब पाटील, आ. संजय बनसोडे साहेब, राजेश्वरजी निटुरे, बसवराज पाटील नागराळकर, लक्ष्मीताई भोसले, प्रितीताई भोसले, कल्याण पाटील साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी बैलजोडीची पुजा व शेतकर्यांचा सत्कार करुन बैलबाजाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले की, उदगीरची शासकीय दुध योजना पूर्ववत सुरु केली जाईल. देवणी जातीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकर्यांना पशुधन खरेदी करण्यासाठी व पशुधन शेतीपुरक व्यवसाय ठरावा यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. शेतकर्यांनी पशुपालन करावे, दुधाची मागणी व पुरवठा यात तफावत आहे. त्यामुळे सकस व दर्जेदार दुधाला खुप मोठी बाजारपेठ आहे, त्यासाठी शेतकर्यांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. सध्या शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. शेतकर्यांना पूर्ण मदत केली जाईल. सरसकट नुकसानभरपाई मिळवून दिली जाईल. शेतकर्यांनी धीर सोडू नये, शेतकर्यांच्या संकटात आम्ही सोबत आहोत असे सांगितले.
या शुभारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, शेतकर्यांनी पशुधनाचे संवर्धन केले तर जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करता येईल. पशुधन कमी झाले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बिघडते असे सांगुन काळाची पावले ओळखुन पशुसंवर्धन करावे असे आवाहन केले. रा.काँ.प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी पशुपालनासाठी अनेक योजना आहेत, त्याची माहिती घेवून पशुसंवर्धन करावे असे सांगुन शेतकर्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून पशुपालन करावे असे मत मांडले. काँगे्रसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी हाळी हंडरगुळीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी आमदार संजय बनसोडे व आमदार बाबासाहेब पाटील यांनी मदत करावी. शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, हाळी हंडरगुळीच्या बैलबाजारावर उदगीर तालुक्याचे अर्थकारण अवलंबुन आहे, त्याच्याकडे लक्ष देवून सोयी सुविधा पुरविण्याची गरज असल्याचे मत मांडले.
बैल बाजाराच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवर अतिथी म्हणून शिवानंद हेंगणे, अशोक भैय्या धुप्पे, अनंतराव भोसले पाटील, शिवाजी भोसले पाटील, बाबुराव माने, रामेश्वर बिरादार, अशोकराव माने, संग्राम भोसले, श्याम डावळे, प्रशांत देवशेटे, ज्ञानोबा गोडभरले, पाशा पटेल, प्रभाकर पाटील, मुनाफ पटेल, नाना धुपे, तुकाराम माळी, प्रज्ञाताई कांबळे, विकीभैया भोसले, खाजा मैनोदिन तांबोळी, सतिश सुळे महाराज, रोहिदास कुंडगिर, संतोष भोसले, ज्ञानेश्वर भांगे, सतिश काळे, माधव कांबळे, मैनोदिन कुरेशी, सुनिल सुकने, विजयकुमार कलवले, ग्रामसेवक कांबळे, सुभाष हादवे, विष्णू धुपे, तात्या भोसले, प्रभाकर मसुरे, परमेश्वर माने, धर्मा कांबळे, फारूक शेख, सुभाष हंगरगे यांच्या सह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments