लातूरातील उद्योगधंदे बंद करण्याचासत्ताधाऱ्यांचा घाट, पाच वर्षात कीती उद्योगधंदे लातूरात उभेकेले? अमित विलासराव देशमुख

लातूरातील उद्योगधंदे बंद करण्याचासत्ताधाऱ्यांचा घाट,
पाच वर्षात कीती उद्योगधंदे लातूरात उभेकेले?
अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी:
सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आमचे सरकार आल्यास लातूरात उद्योगधंदे उभे करण्याची साखळी निर्माण करू असे आश्वासन केंद्रातील आणि राज्यातील सरकारने दिले. त्यांना कोणताही नवा उदयोग येथे सुरू करता आला नाही. या उलट काँग्रेसच्या काळातील लातुरातील उद्योगधंदे बंद करण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट सरकारकडून घातला जातआहे. पाच वर्षात किती उद्योगधंदे भाजपने लातूरात उभे केले याचे उत्तर जनतेला द्यावे असा हल्लाबोल करीत आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत उद्योगधंदे उभे करणारे काँग्रेसचे सरकार निवडूनउद्योगधंदे आडवा आणि  जिरवा धोरण राबवणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना घरी बसवा असे आवाहन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.


     आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत बुधवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील शाम नगर बारा (१२ नंबर पाटी )खंडापूर या ठिकाणी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेटी दिल्या. शामनगर (१२ नंबर पाटी) या ठिकाणी रस्ते डांबरीकरण,विद्युतीकरणरस्ते सिमेंट काँक्रिटीकरण आदी कामांचा शुभारंभखंडापूर येथे स्थानिक आमदार निधीतून महादेव नगर येथे बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण व ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.
आमदार अमित देशमुख म्हणाले की,लातुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी लातूरची अनेक क्षेत्रात भरभराट केली. लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख,माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर,माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी लातूरला विकासाचा वसा आणि वारसा दिला. त्यामुळे पिढ्यानपिढ्या लोक त्यांचे नाव घेत आहेत. सत्य मार्गाची वाट दाखवणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी निवडून आणावे असे आवाहन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.
     यावेळी विक्रम हिप्परकर दगडूसाहेब पडिले,गोविंद बोराडेसोनाली थोरमोटे पाटीलमनोज पाटीलमोहन सुरवसेसुपर्ण जगतापशरद देशमुखशाम नगर(१२ नंबर पाटी )  येथील सरपंच सुरेखा बनसोडेशिवलिंग धुमाळ,विलास गोडसेशेरखान पठाणसंपत शिंदे,विनायक चव्हाणबालाजी चव्हाणव्यंकट जाधवभीमराव चौगुलेसुभाष सूर्यवंशी व शाम नगर (१२ नंबर पाटी ) ग्रामस्थ तर खंडापूर येथे हे सरपंच राजकुमार पाटीलजगन्नाथ कैले,बब्रुवान अतकरेरामराव साळुंकेसंजय पाटील,  अमर कैले,  राम चामेपंडित रेड्डीसुरेश घार,नारायण कैलेचंद्रशेखर दंडीमेमहेश वलसे,किरण कैलेरामचंद्र सुडेपंडित रेड्डी यांच्यासह खंडापुर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments