देशाला गांधीजींच्या विचाराची गरज -प्रा. डाॅ. दत्तात्रय पाटील



देशाला गांधीजींच्या विचाराची गरज -प्रा. डाॅ. दत्तात्रय पाटील
उदगीर दि. 21 (रफ़्तार) - देशाला सर्वांगिण विकास साधायचा झाल्यास व अहिंसा या विचाराची आजही तेवढीच गरज असल्याचे प्रचार्या धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय यांनी केले. ते येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर व राष्ट्रपिता महात्मा गांधी 150 वी जयंती उत्सव समिती उदगीर-देवणी-जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महात्मा गांधी विचार यात्रा’ या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
या प्रसंगी मंचावर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे शैक्षणिक संचालक प्राचार्य संजय हट्टे, समर्थ महाविद्यालय एर्कुका प्राचार्य प्रमोद चैधरी, सिद्धार्थ बोडके, रसुल पठाण, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्योती स्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, प्रा. गणेश तोलसरवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पुढे डाॅ. पाटील म्हणाले, महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसा या दोन तत्वांना आजही जगभरात पुजले जाते. महत्मा गांधीजींनी भारताला पर्यायाने जगाला दिलेली ही मोठी देणगी आहे. त्यांच्या या विचाराची जोपासना होणे व विद्याथ्र्यांच्या मनात रूजवण्याची आवश्यकता आहे. 
कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व स्वमी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अमृता रायचूरकर यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्राचार्य संजय हट्टे यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा. बालाजी गायकवाड, प्रा. आसिफ दायमी, प्रा. वसंुधरा पाटील, प्रा. पुजा बिरादार, प्रा. हनुमंत सुर्यवंशी, प्रा. कैलास कांबळे, प्रा. बालाजी सकनुरे, प्रा. श्रीपाद अहंकारी, प्रा. नागसेन तारे यांच्यासह विद्याथ्र्यांची मोठ्याा संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments