लिटल एंजिल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या ओमकार सावळेचे क्रीडा स्पर्धेत यश ।

लिटल एंजिल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूलच्या ओमकार सावळेचे क्रीडा स्पर्धेत यश

उदगीरः
          नुकत्याच लातूर येथे पार पडलेल्या  जिल्हा स्तरीय शाळेय क्रीडा स्पर्धेत लिटल एंजिल्स दत्तगुरु इंग्लिश स्कूल उदगीरच्या ओमकार सावळे या विद्यार्थ्याला चौदा वर्षाखालील मुलांच्या अॅथलेटिक्स ४०० मी. व ६०० मी धावणे  या क्रीडा प्रकारात अनुक्रमे द्वितीय व तृतीया पारितोषिक मिळाले आहे. त्याची ६०० मी. धावणे या क्रीडा प्रकारासाठी पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवडही झाली आहे.

           त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजकुमार ममदापुरे, सचिवा आशा ममदापुरे, प्राचार्य ज्ञानोबा घोगरे, प्राचार्य सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
             क्रीडा शिक्षक धम्मशील कांबळे व माधव भांगे यांनी अभिनंदन केले. 
             तसेच शाळेतील सरफराज मनियार, जहांगीर पटेल, बिरगोंडा देवर्षे, मोहम्मद सुलेमान , रवी चन्नाळे, अविनाश कांबळे, तानाजी चव्हाण, दिक्षा शिंदे, मंजूश्री गुडसूरकर, शिल्पा परगे, प्रीती शेटकार, शिवानी रत्नपारखी, नेहा बोडके, सारिका पेचफुले, नम्रता पाटील, संगीता पोपलाई, राजेश्वरी पारसेवार, अनिता सुवर्णकार, रिझवाना काझी, आम्रपाली भालेराव, मृनालिनी ठाकुर, नौशीन सदाफ, सीमा घोगरे आदी शिक्षकांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
             

Post a Comment

0 Comments