प्रा. प्रदीप वीरकपाळे यांचा पी.टी.ए. च्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न



प्रा. प्रदीप वीरकपाळे यांचा पी.टी.ए. च्या वतीने भव्य नागरी सत्कार संपन्न
           पद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या हस्ते नुकताच राज्यस्तरीय मानव विकास पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्याबद्दल, पी. टी.ए. चे सचिव व श्री रत्नगंगा केमिस्ट्री क्लासेसचे संचालक प्रा. प्रदीप वीरकपाळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 
             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, सहकारमहर्षी मा.चंद्रकांत आण्णा वैजापुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मा.संजयभाऊ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रा. प्रवीण भोळे, सत्कारमूर्ती प्रा. प्रदीप वीरकपाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
             या कार्यक्रमाचे अतिशय सखोल, मनोरंजक व सविस्तर असे प्रास्ताविक प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांनी करून उपस्थितांची मने जिंकली.त्यानंतर सर्व मंचावरील मान्यवरांची यथोचित भाषणे झाली यावेळी प्रा. प्रवीण भोळे सरानी प्रा. वीरकपाळे सरांना त्यांच्या कष्टाची पावती मिळाली असून ते किंग ऑफ केमिस्ट्री असून तेच  उदगीरचे मोटेगावकर आहेत असे गौरवोद्गार काढले तर मा.संजयभाऊ बनसोडे व मा.मुन्ना पाटील यांनी वीरकपाळे सरांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन  प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी केले. या कार्यक्रमांस उदगीर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments