आमदार आ सुधाकर भालेराव यांच्या पाठपुरव्यास यश
उदगीर-जळकोट :- लातूर जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळ निर्माण झाल्याने व सोयाबीन सह इतर पिकाच्या अपेक्षित उत्पन्नात ५०% पेक्षा अधिक घट येत असल्याचे दिसून येत असल्याने आमदार सुधाकर भालेराव यांनी पीकविमा आदेशानुसार विमाधारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ नुकसानभरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे केली होती त्यानुषंगाने जिल्हाधिकारी लातूर यांनी १९/०९/२०१९ रोजी सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी अधिसूचना काढली असून २५% आगाऊ नुकसानभरपाई विमाधारक शेतकर्यांना विहित मुदतीत देण्याबाबत भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई यांना आदेश दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०१९ साठी ४ लक्ष पेक्षा अधिक शेतकर्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ अंतर्गत १० लक्ष ८२ हजार अर्जाद्वारे जवळपास ४३ कोटी रुपये विमा हफ्ता सोयाबीन सह सर्व पिकांसाठी भरलेला आहे. पेरणीपूर्व व पेरणीनंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने पावसाभावी पिके करपली तसेच पिकांची वाढ झाली नाही. गत वर्षी दुष्काळ व यावर्षी खरीप हंगाम संपायची वेळ आली तरीही पावसाळा सुरूच झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी व विंधन विहिरीना पाणी नाही.जनावरांना चारा व पाणी उपलब्ध झाला नाही.अशी भीषण परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे.शेतकरी पावसाभावी नैसर्गिक आपत्तीत सापडला आहे.महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१९ योजनेंतर्गत च्या दि.२२ मे २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार व त्यातील नुकसान भरपाई मंजुरीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करताना पावसातील खंड व दुष्काळ या बाबीमुळे शेतकर्यांना अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५०% पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसानभरपाई च्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना २५% मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुधाकर भालेराव यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी च्या माध्यमातून प्रश्न उपस्थितीत करून शिष्टमंडळ मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती.त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी लातूर यांनी दि.३०/० ८/२०१९ रोजी जिल्हा स्तरीय प्रधानमंत्री पिक विमा योजना समितीची बैठक घेऊन नजर अंदाज अहवालासाठी तालुकानिहाय उपसमिती स्थापना केली व तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सदरील सोयाबीन पिक परिस्थिती पेरणी चा अहवाल,पर्जन्यमान अहवाल,स्थानिक प्रसार माध्यमाचे अहवाल,MNCFC संकेत स्थळावरील PASM ग्राफ,दुष्काळ सदृश्य परिस्थिती चा अहवाल या आहावालाधारे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे पिकाच्या सरासरी उत्पन्नच्या ५०% पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नुकसानभरपाईस पात्र असल्याचे जिल्हाधिकारी यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उदगीर जळकोट लातूर,रेणापूर,औसा,निलंगा,शि.अनंतपाळ,,देवणी,चाकूर,या तालुक्यातील अधिसूचित सर्व मंडळातील सोयाबीन विमाधारक शेतकऱ्यांना अधिसूचना जाहीर झालेल्या तारखेपासून म्हणजेच १९/०९/२०१९ रोजी पासून एक महिन्याचे आत २५% आगाऊ नुकसानभरपाई ची मंडळनिहाय ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न व नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादकता नुसार येणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे आदेश जिल्हाधिकारी लातूर यांनी भारतीय कृषी विमा कंपनी लि.मुंबई या विमा कंपनीस अधिसूचनेद्वारे दिले आहेत.
श्री.जी.श्रीकांत साहेब जिल्हाधिकारी लातूर यांनी अत्यंत भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल व सक्षम निर्णय घेतल्याबद्दल आमदार सुधाकर भालेराव यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, कृषी मंत्री डाँ अनिल बोंडे,पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व जिल्हाधिकारी लातूर यांचे आभार मानले असुन उदगीर व जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आ भालेराव यांच्या प्रयत्ना बध्दल अभिनंदन होत आहे
0 Comments