उजनीच्या पाण्याचा थेंबही लातुरात आणला नाही
पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा-अमित विलासराव देशमुख
जलयुक्त शिवार योजनेमुळे लातूर जिल्हा पाणीदार झाला आहे. यापुढे आता लातूरला उजनीच्या पाण्याची गरज नाही असे पालकमंत्री सांगत होते. सदया लातूरला पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई आहे. यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर उजनीचे पाणी आणणार, नाही तर राजीनामा देणार असे म्हणणाऱ्या पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर बोलत आहेत. त्यांनी पाच वर्षात उजनीच्या पाण्याचा थेंबही लातुरात आणला नाही, म्हणून क्षणाचाही विलंब न करता तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदार संघात जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी आर्वी येथे बोलतांना केली.
0 Comments