उदगीर विधानसभाकडे खास लक्ष नाही? भाजपाच्या गोटात चाल्लय तरी काय?



उदगीर विधानसभाकडे खास लक्ष नाही? भाजपाच्या गोटात चाल्लय तरी  काय?

by बसवेश्वर डावळे

लातुर जिल्हातील उदगीर विधानसभा याकडे खास लक्ष नाही अस असल तरी त्या ठीकाणच्या घडामोडी भाजपाच्या गोटात माञ काहीतरी चालल्याचे चिञ दिसत आहे विद्यमान दहा वर्षे असलेले उदगीरचे आमदार यांना डावलून पक्षान डाॅ.अनिल कांबळे यांना उमेद्वारी दिली माञ प्रचार यंञनेत तेथिल माजी आमदारासह जिल्ह्यातील पक्षाच कुठलहि नेञत्व त्यांच्या सोबत फिरताना दिसत नाही आणि कळस म्हणजे त्यांनाही यांची गरच नाहि असच दिसतय प्रचार यंञनेच्या बॅनर मध्ये लातुर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचे बॅनरवरील फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळाले याचा अर्थ स्थानिक नेत्यांची या नवख्या उमेद्वाराला गरज नसल्याच दिसत आहे चर्चा अाहे की गोविंदअण्णा केंद्रे विद्यमान आमदाराचा पत्ता कट करत लातुर जिल्यातील संभाजी पाटील यांना धक्का देण्यासाठी व भाजपात आपल ही स्थान आहे हे दाखवण्यासाठी त्यांना उमेद्वारी मिळवून दिल्याच बोलल जातय आता थेट योगी आदित्यनाथ च प्रचाराला येणार म्हणटल्यावर कार्यकर्त्य आणि नेत्तांची गरज काय असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहे .त्यामुळे या नवख्या उमेद्वाराला भाजप कळली की नाही आणि कळेल का नाही हा माञ प्रश्न आहे,
माजी खा.सुनील गायकवाड विद्यमान खा,सुधाकर श्रृंगारे आ.सुधाकर भालेराव आणि महत्वाच म्हणजे तालुक्याचा अध्यक्षच गायब झाल्याच पहायला मिळाले त्यामुळे भाजपाचे तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादीच्या गोट्यात तर गेले नाहित ना अस संशय निर्माण करणार वातावरण अस भाजपच तयार करताना दिसत आहे. कुठलिही लढाई कार्यकर्ते लढत असतात .नेते मंडळी हे फक्त मार्गदर्शक असतात त्यामुळे मार्गदर्शक आणि कार्यकर्ते यांचा जर सम्नवय झाला नाही तर निवडणुकीचे परिणाम वेगवेगळे पहायला मिळेल  हे माञ निश्चित आहे 

Post a Comment

0 Comments