लोकनेते चंद्रशेखर भोसले यांनी उदगीर आणि जळकोटच्या सर्वांगीण व चौफेर विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राजकारण व समाजकारण केले


लोकनेते चंद्रशेखर भोसले यांनी उदगीर आणि जळकोटच्या सर्वांगीण व चौफेर विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून राजकारण व समाजकारण केले. आजही राजकीय व सामाजिक क्षेत्रात चंद्रशेखर भोसले यांच्या या कार्याची सातत्याने दखल घेतली जाते हीच त्यांच्या कामाची पावती आहे.

 आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदगीर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी संजयभाऊ बनसोडे यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असलेल्या व्यक्तीला आपला 'आमदार' म्हणून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन श्रीमती लक्ष्मीताई चंद्रशेखर भोसले यांनी केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झालेल्या आदरणीय भोसले वहिनींच्या प्रचार दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघातील गावागावात त्यांना ऐकण्यासाठी व लोकनेते चंद्रशेखर भोसले यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अलोट गर्दी होत आहे. श्रीमती लक्ष्मीताई भोसले वहिनींनी सर्व कार्यकर्त्यांना चंद्रशेखर भोसले साहेबांचे विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी चंद्रशेखर भोसले यांना श्रद्धांजली म्हणून संजय बनसोडे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे भावनिक आवाहन केले आहे.


● बाळासाहेब मरलापल्ले

Post a Comment

0 Comments