संजय बनसोडे नाम ही काफी है!


संजय बनसोडे नाम ही काफी है!

उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातील घराघरातील प्रत्येकाशी आपुलकीचं नातं जोडणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून संजय बनसोडे यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आज मतदार संघातील प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील समस्यांचा संजय बनसोडे यांना अभ्यास झाला आहे. त्यांनी प्रकाशित केलेला 'विकासनामा' अतिशय दर्जेदार आणि वस्तुनिष्ठ आहे. जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट शक्य आहे आणि तसे झाले तर मतदार संघाचा संपूर्ण कायापालट होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली एमआयडीसी जर सुरू झाली तर अनेक हातांना काम मिळणार आहे. आज रोजगाराच्या शोधात तालुक्यातील किमान 25000 तरुण स्थलांतरित झाले आहेत, याचाच अर्थ कुणाचा बाप, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ आज घर असूनही शहरात निर्वासितांचे जीवन झोपडपट्टीत जगत आहे. याचे शल्य कोणत्याही सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्याला बोचत नाही हेच दुःख आहे. पण संजय बनसोडे यांनी आपल्या जाहीरनाम्यात पहिलेच वचन एमआयडीसी करण्याचे दिले आहे. त्यांच्या या संकल्पाला आपण बळ देण्याची गरज आहे. खरे तर निवडणुकीत आश्वासनावर मतदार विश्वास ठेवत असतो पण संजय बनसोडे यांनी आश्वासन नाही तर वचन दिले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आज सत्ताधारी पक्षाकडून स्थानिक विषयांना बगल देऊन भावनिक विषयावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न सुरू आहे व हेच मतदारसंघासाठी घातक आहे. आज मतदारसंघात रोजगार ही समस्या सर्वात मोठी आहे पण त्याकडे सत्ताधाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे. तेव्हा मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता संजय बनसोडे यांनी प्रकाशित केलेला जाहीरनामा जरूर वाचावा. संजय बनसोडे या माणसाने मतदार संघाचा किती बारकाईने विचार केला आहे हे सहज दिसून येते. तेव्हा मतदारांना माझे नम्र निवेदन राहील की त्यांनी काम करणाऱ्या माणसाला मतदान करावे. संजय बनसोडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली उदगीर जळकोट तालुक्‍याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारांनी विकासासाठी मतदान करावे; केवळ भावनिक विषयांच्या सापळ्यात अडकून विकासाला खीळ घालू नये. संजय बनसोडे आपल्या सर्व अपेक्षा निश्चित पूर्ण करतील हा विश्वास मनापासून वाटतो. 
● अहमद सरवर

Post a Comment

0 Comments