मराठवाडा मुक्ति संग्राम : बहुसंख्याकांचे नष्टचर्य संपले,अल्पसंख्याकांचे ???

मराठवाडा मुक्ति संग्राम :
बहुसंख्याकांचे नष्टचर्य संपले,अल्पसंख्याकांचे  ???

पोलिस अक्शनला आरंभ झाला होता,पोलीस ऍक्शन 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू झाले.सोलापूर मार्गे सैन्य निजामी हद्दीत घुसले,नळदुर्ग मार्गे ते पुढे सरकले,प्रतिकार झाला नाही, सरदार पटेलनी आदेशलेली ही पोलीस कारवाई होती,17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान मुक्त झाले


केवळ 5 दिवसांत हैदराबाद संस्थान बंधमुक्त झाले.निजाम शरण आला.गावातील लोक निर्भयपणे निलंगा व लातूरसारख्या ठिकाणी आता जाऊ लागले. नवनवीन बातम्या कळू लागल्या. अखेर सर्व संदर्भच बदलले.पण दुर्दैव असे की गावोगावी मुसलमानांची घरे लुटणे,जाळणे हे सत्र सुरू झाले.बादल्याची भावना हिंदुच्या मनात उफाळून वर आली.मुसलमानांनी जिथे अत्याचार केले होते,हिंदूंची स्त्रियांची बेअब्रू केली होती, बलात्कार व खून केले होते,तिथे तर मोठ्याप्रमाणात बदला घेण्यात आला.माझ्या गावात मुसलमानांची केवळ चार-पाचच घरे होती.त्यांनी हिंदूशी गैरव्यवहार केला नव्हता. उलट शेजारच्या रझाकारांना समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.गौर आणि चिंचोलीतील अनेक मुसलमानांना क्रूरपणे मारण्यात आले.चिंचोलीचे भगवान बुवा हे या कामात आघाडी वर होते.अनेकांनी गावातून पळ काढला. स्त्रियांची अब्रू लुटण्याचे प्रकार मात्र फारसे झाले नाहीत.गौर या गावातील सापडतील ते मुस्लिम पुरुष मारण्यात आले.काहींनी पळ काढला. स्त्रियांना मात्र धक्का लावण्यात आला नाही.लहान मुलगे ही मारण्यात आली. मुलींना धक्का लावला नाही,असे सांगण्यात आले.गौर या गावचा पोलीस पाटील मुसलमान होता.रसुल पटेल हे त्याचे नाव.त्याने व त्याच्या मुलांनी गावात धुमाकूळ माजविला होता.रसुल पटेल व पाशा पटेल यांनी गौर या गावी खूप अमानुष कृत्य केली होती.त्यांना निर्दयपणे ठार मारण्यात आले.


मुसलमान स्त्रिया,पुरुष व मुले यांचे लोंढेच्या लोंढे गावे सोडून हैदराबादच्या दिशेने निघाली. तिथे आश्रय मिळेल या आशेने. त्या काळी दळणवळणाची साधने नव्हती.रात्र झाली की एखाद्या गावात आश्रय घ्यायचा पहाटे उठून पुढचा प्रवास!.आमच्या दुसऱ्या वाड्यात आप्पांनी कितीतरी मुसलमानांना आश्रय दिला वाईट वेळ सांगून येत नाही आणि ती कोणावर ही येऊ शकते असं ते म्हणत.या लोकांनी आपल्यावर अत्याचार केले पण आपण माणुसकी सोडायची नाही आमच्या गावातील लोकांनी माणुसकी सोडली नाही मी स्वतः आश्रयास आलेल्या मुसलमान स्त्री-पुरुषांना व लहान मुलांना जेवण दूध-पाणी घरून नेऊन दिले हादेखील माझ्यावर झालेल्या संस्काराचा भाग होता ती शिदोरी मला आयुष्यभर पुरली.


 पोलिस कारवाईच्या संदर्भात आमच्या गावात घडलेल्या आणखी एक एका घटनेविषयी मी येथे माहिती देऊ इच्छितो ोलीस कारवाई सुरू होण्यापूर्वी कौठयात एक मुसलमान फकीर आला होता. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ या गावचा मी आहे,असे तो आम्हाला सांगायचा तेव्हा त्याचे वय पंचवीस तीस वर्षाचे असेल. छातीला स्पर्श करणारी काळी कुळकुळीत दाढी, डोक्यावर वाढलेले लांब केस त्यावर हिरवा फेटा, अंगात गुडघ्यापर्यंत हिरव्या रंगाचा मळकट लुंगी, हातात काळा कटोरा चेहर्‍यावर देवीचे व्रण, काळा सावळा रंग या फकिराच्या चेहऱ्यावर कधी मायूसीतर कधी हास्य. खूप उपजीव्हीके साठी हा फकीर घरोघरी जाऊन अल्ला के नाम पे भीक्षा मागायचा. गावातील प्रमुख लोकांशी त्याच्या ओळखी झाल्या होत्या सर्व गाव त्याला ओळखत होते कारण तो यापूर्वीही कवट्याला आला होता. पोलीस कारवाईत तो कवठयात होता. रझाकारी जमान्यात त्याला गावाचा आधार वाटायचा.


 भीतीमुळे आमच्या गावी आलेला हा फकीर कवठयाच्या बाहेर निघाला नाही कौटयातील वातावरण चांगले होते  उलट आम्ही मुसलमान स्त्री-पुरुषांना लेकरा बाळासहित थारा दिला. थोड्या दिवसानंतर परिस्थिती निवडली तरी पण हा फकीर आपल्या गावी परतला नाही आणि म्हणून गावातील लोक त्याच्याविषयी कुतूहलाने बोलू लागले शादीशुदा असेल का?त्याचे कुणी नातलग नसतील का? I



7⅝

का कुणास ठाऊक या फकिराने आपल्या अंगावरचा फकिराचा हिरवा वेश उतरला आणि संन्याशाचा भगवा वेष धारण केला शेवटी शेवटी केवळ भगवी लुंगी त्याच्या अंगावर राहिली या फकिराने हे सर्व स्वखुशीने केले होते त्याच्यावर कोणी दडपण आणले नव्हते गावातील लोकांनी त्याचे नाव गोविंद बुवा ठेवले.

 गोविंद बुवा फारसे शिकलेले नव्हते आलीफ,बे,पे ही उर्दू मुळाक्षरे त्यांनी लहानपणी पाठ केली होती पण त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते ' काला अक्षर भैस ' बराबर अशी त्यांची अवस्था होती. त्यांना कुराणातील काही आयाती मात्र पाठ होत्या त्यांना तुकारामाचे काही अभंग ही पाठ झाले होते ते बहुश्रुत होते. मनाने भाबडे होते. उर्दूतून बोलणे त्यांनी आता सोडून दिले होते मराठी ही त्यांची भाषा होती. गावात होणार्‍या भजन-कीर्तनात ते सहभागी व्हायचे.

 गोविंदबुवा एकदाही कुठल्या गावी गेले नाहीत.त्यांनी आपल्या गत जीवनाचे पान कोणासमोरही उघडले नाही.

( लेखक:-डॉ जनार्धन वाघमारे, राज्यसभा सदस्य, कुलगुरू srt मराठवाडा विद्यापीठ,प्राचार्य शाहू कॉलेज लातूर,नगराध्यक्ष,
मूठभर माती,पान न.50,51,52 )



वरील लेखात मी स्वतःच एक ही शब्द टाकलेला नाही,लेखक प्रख्यात,प्रकांड पंडित आहेत,
हे इथं टाकलेलं लेखन सांकेतिक आहे,संपूर्ण मराठवाड्यात हीच परिस्थिती होती किंवा याच्यापेक्षा भयानक,भयंकर. लहान मूल,स्त्रिया,वयोवृद्ध कुणाला ही सोडण्यात आलं नाही,बारवची बारव भरली होती,कधी नव्हें ते या सप्टेंबर महिन्यात तुफान पाऊस पडत होता,या पावसामुळे कित्येक लोकांचे जीव वाचले,भर पावसात लोक 8,8 दिवस भिजत शेतात लपून राहिले.
कित्येक गावात मुस्लिम स्त्रियां बाटवून घरी ठेवण्यात आल्या,याची असंख्य उदाहरण आपल्याला सापडतील,कित्येक स्वातंत्रसैनिकांनी आपल्या आत्मकथन मध्ये याचा उल्लेख केलेला आहे.किती ? कुटुंब देशोधडीला लागली याची गिणतीच नाही,गोविंद बुवाला जिवाच्या भीतीतून धर्मातर करावं लागलं याची सुद्धा असंख्य उदाहरणे सापडतील,अल्पसंख्याक समाजाचं धर्म,संस्कृती,संपत्ती सगळ जमीनदोस्त झाली होती,कुणी कैवारी उरला नव्हता.ज्या निजामाच राज्य रहावं म्हणून रजाकारांचे अत्याचार वाढले होते,ते पाकिस्तानला पळून गेले होते किंवा मारले गेले होते,



निजामाने ढुंकूनही अत्याचार पीडित लोकांची दखल घेतली नाही,दौरा काढला नाही,आर्थिक मदत केली नाही,उलट पुढचे 8 वर्षे ते आंध्रचे राज्यप्रमुख या पदावर कायम राहीले,सर्वसामान्य मुस्लिमांच जीवन संपूर्णतः उध्वस्त झालेलं होत.आपल्याच शेजाऱ्याची हत्या,संपत्ती लोटणारे हे चोर,गुंड,मवाली,दरोडेखोर guilty फीलिंग मूळे पुढे कित्येक दशके खाली मान घालून जगत होते.पुढे हळूहळू यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त होत गेली.



हैदराबाद मुक्ती संग्राम या विषयावर कित्येक लोकांनी phd केली,व्याख्यान देत फिरताना दिसतात पण शपथ आहे ह्यांना अल्पसंख्याक समाजावर झालेल्या ह्या हत्याकांडावर जर लिहीत असतील,बोलतं असतील तर,
अख्खी 2 पिढ्या ह्या मध्ये गारद झाल्या,कित्यक अजून सावरलेले नाहीत.जगात जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे लोकशाहीत अल्पसंख्याक असणं पाप ठरलेलं आहे,नाकारता येणार नाही असं हे वास्तव आहे.

मुजीब हमीद काझी
8087562875

Post a Comment

0 Comments