कोणते पालकमंत्री खोटे आत्ताचे की गेल्या वर्षीचे ?

कोणते पालकमंत्री खोटे आत्ताचे की गेल्या वर्षीचे ?

अभिमन्यू पवारांना उजनीचे श्रेय मिळू नये म्हणून गतवर्षी मुख्यमंत्र्यासमोर उजनीच्या पाण्याची गरज नाही म्हणणारे संभाजी पाटील आता दोन वर्षात पाणी का आणू म्हणतात?

● वाढलेली पाणी पातळी कुठं गेली ? ● जलयुक्तच्या यशाचा दावा खोटा ?
● इंद्रप्रस्थ जलभूमीचे अपयश उघडे पडू नये म्हणून खटाटोप केला का ?

#जावेद_शेख (लातुर )

मागील कांही दिवसात प्रकर्षाने जाणवत असलेल्या लातुर शहराच्या पाणी टंचाईचे गांभीर्य पाहता सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर उजनीचे पाणी लातूरला आणू असे आश्वासन,दावे देण्याचा सपाटा लावला आहे.सत्तेत असलेल्या भाजपचे पालकमंत्री पुढील दोन वर्षात पाणी आणतो म्हणत आहेत तर विरोधात असलेले लातूरचे आमदार सत्ता येऊ द्या उजनीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू असे सांगत आहेत.विरोधात असलेले आमदार अमित देशमुख 2014 ला सत्तेत होते हे ही विसरतात आणि त्यावेळी त्यांनी लातूरला लिंबोटीचे पाणी आणू हे दिलेले आश्वासन देखील साफ विसरतात.सत्तेत असलेल्या पालकमंत्री संभाजी पाटील जेंव्हा पुढील दोन वर्षात उजनीचे पाणी लातूरला नाही आणले तर आपल्या पदाचा राजीनामा देईन असे छाती ठोकपणे सांगतात,मात्र हे सांगताना मागील 1 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये लातुरात अटल आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आयोजित भर सभेत हजारोच्या समुदायासमोर मुख्यमंत्री व इतर दिग्गज मंत्री  व्यासपीठावर असताना केलेला दावा साफ विसरून जातात.त्यावेळी पालकमंत्र्यांनी असा दावा केला की मागील दोन वर्षांच्या काळात जी जिल्ह्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामे झाली आहेत त्यामुळे पाणीपातळीत फार मोठी वाढ झाली असल्याने आता उजनीच्या पाण्याची गरज भासणार नाही.मग आता 1 वर्षातच असे काय झाले की पालकमंत्री संभाजी पाटील यांना उजनीचे पाणी लातूरला दोन वर्षात देतो हे सांगावे लागत आहे.मग पालकमंत्री आत्ता खोटं बोलत आहेत का ऑक्टोबर 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांसमोर खोटं बोलले याचा खुलासा लातूरकरांसमोर व्हायला पाहिजे.तसेच जलयुक्त मुळे पाणीपातळी वाढली तर मग ती 1 वर्षातच गेली कोठे याचेही उत्तर मिळायला हवे.वास्तविक पाहता त्यावेळी पालकमंत्र्यांनी फक्त राजकारण केले ज्याचा फटका आज लातूरकरांना भोगावा लागतो आहे.त्यावेळी मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव अभिमन्यू पवार यांनी सुरुवातीला भाषण करताना "मुख्यमंत्री साहेब,आपण लातूरला खूप काही दिले आहे,फक्त एकदा #उजनीच्या_पाण्याची" घोषणा करा लातूरकर आपणाला कायम स्मरणात ठेवतील " अशी प्रामाणिक,पोटतिडकीने भावनीक साद घातली होती.आणि साहजिक मुख्यमंत्री त्याबाबतीत सकारात्मक होते.मात्र मुख्यमंत्री यांच्या पूर्वी पालकमंत्री भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी अभिमन्यू यांना एवढ्या मोठ्या विषयाचे जो मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्याचे श्रेय मिळू नये व परिणामी आपली पुढे चालून राजकीय अडचण होऊ नये याची गणित घालत अभिमन्यू यांची मागणी खोडून काढली व मागील दोन वर्षात पाणीपातळी विक्रमी वाढली असल्याचा दावा केला व मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उजनीच्या विषयाला बगल द्यावी लागली.परिणामी आज लातूरकरांना पाण्यासाठी भटकंती करायची आणि दुसऱ्याच्या हाताकडे पहायची दुर्दैवी वेळ आली आहे.मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळी घोषणा केली असती तर किमान आतापर्यंत काम सुरू तर झाले असते.खर तर उजनीच्या पाण्याशिवाय लातूरला कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नाही हे कोणीही नाकारू शकत नाही असे त्रिकाल सत्य आहे.वास्तविक पाहता उजनीचा विषय हा पालकमंत्री,आमदार यांच्या अखत्यारीतील नाहीच आहे,फक्त हे नेते निवडणुकीच्या तोंडावर तो मुद्दा उपस्थित करत आहेत.त्यासाठी मुख्यमंत्री यांचीच इच्छाशक्ती हवी आहे.हे ठाऊक असल्यानेच अभिमन्यू यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातली होती.त्यावेळी अभिमन्यू पवार यांची विकासकामे फार जोरात लातुरसह जिल्ह्यात होती आणि आजही आहेत.मागील सहा महिन्यात तब्बल 352 कोटी रुपयांचा निधी अभिमन्यू पवार यांनी औसा विधानसभा मतदारसंघात आणला आहे.लातुर शहरातील अल्पसंख्याक शदिखाना असेल,लिंगायत स्मशानभूमी असेल,शहरातील जी शौचालय दिसत आहेत त्याचे पूर्ण श्रेय हे अभिमन्यू पवार यांनाच जाते हे नाकारून चालणार नाही.मात्र सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असलेल्या लातुर जिल्ह्याचे राजकारण मात्र अश्या काही चुकीच्या व्यक्तीमुळे,त्यांच्या चुकांमुळे रसातळाला जात आहे म्हंटले तर ते चुकीचे होऊ नये.फक्त श्रेय आपणाला मिळणार नाही हा उद्देश सफल व्हावा या दृष्टीने आणि त्यावेळी जी पालकमंत्र्यांनी इंद्रप्रस्थ अभियान योजना राबविली होती त्याचे अपयश झाकण्यासाठी हा सर्व खटाटोप त्यांनी केला असा सरळ अर्थ या सर्वाचा निघतो.कारण जर यशस्वी झाली असती तर त्याचा परिणाम दिसला असता आणि पाण्यासाठी एवढी बेहाल व लातूरकरांची वणवण झाली नसती.पण दुर्दैवाने सामान्य लातूरकरांना आज त्याची किंमत मोजावी लागते आहे,व पुढे आणखीन किती किंमत मोजावी लागणार हे येणारा काळच ठरवेल.पालकमंत्र्यांना तर लातुरातून निवडणूक लढवायची नाही त्यामुळे त्यांना वैक्तिक याची काही (राजकीय) किंमत मोजावी लागेल अशी मुुुळीच शक्यता नाही.व शहरात देशमुखासोबत असलेल्या अंतर्गत राजकीय सेटिंगमुळे अश्या कामामुळे कॉंग्रेसलाच फायदा होणार आहे त्यामुळे एका दगडात दोन पक्षी सह लातूरकरांना पालकमंत्री निलंगेकर यांनी मारले म्हंटले तर ते चुक ठरणार नाही.

Post a Comment

0 Comments