उदगीर: लातूर जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या सदस्यपदी उदगीर येथील प्रसिद्ध व्यापारी विजयकुमार पारसेवार यांच्यासह उदगीर शहरातील पाच जणांची निवड करण्यात आली आहे.
उदगीर येथील श्री नगरेश्वर मंदिर येथे
लातुर जिल्हा आर्य वैश्य महासभा निवड प्रकिया साठी बैठक पार पडली. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, भानुदासराव वट्टमवार, आरक्षण समितीचे अध्यक्ष प्रदिप कोकडवार रमाकांत रायवार, गजानन चिद्रेवार, शशिकांत कोटलवार, अभय कोकड, गजानन डुबे, सुमित रुद्रवार, दत्तात्रय दमकोंडवार, सूर्यकांत महाजन उपस्थित होते. यावेळी आर्य वैश्य महासभा जिल्हा समितीवर विजयकुमार पारसेवार, गणेश मुक्कावार, श्याम मलगे, धनंजय बच्चेवार,
ज्ञानेश्वर पारसेवार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments